Hepatitis kills 3,500 people every day

Hepatitis kills 3,500 people every day: सावधान! हेपॅटायटीसने रोज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

Blog आरोग्य भारत

Hepatitis kills 3,500 people every day: २०२२ मध्ये भारतात हेपॅटायटीसची ३.५ कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावर एकूण प्रकरणांपैकी ११.६ टक्के होती. आता हे प्रमाण चीनखालोखाल दुसऱ्याच क्रमांकावर आहे.

Hepatitis kills 3,500 people every day
Hepatitis kills 3,500 people every day

नवी दिल्ली: संसर्गामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये ‘हेपॅटायटीस’ या आजाराचा समावेश होतो. या आजारातूनच काविळसारखा गंभीर आजार होऊ शकतो. २०२२ मध्ये भारतात हेपॅटायटीसची ३.५ कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावर एकूण प्रकरणांपैकी ११.६ टक्के होती. आता हे प्रमाण चीनखालोखाल दुसऱ्याच क्रमांकावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक हेपॅटायटीस अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे यकृताला सूज येणे. दरवर्षी सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू या आजाराने होतो, असे अहवालात म्हटले आहे.

काय सांगते आकडेवारी?

भारतामध्ये २०२२ मध्ये २.९८ कोटी हेपॅटायटीस बी, हेपेटायटीस सी संसर्गाची संख्या ५५ लाख.

भारतात २०२२ मध्ये ९८,३०५ लोक ‘हेपॅ- टायटीस बी मुळे मरण पावले, तर २६.२०६ लोक ‘हेपे- टायटीस सीने मरण पावले.

४० ते ५०%  हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि २०- ३०% सिरोसिस प्रकरणे भारतातील आहेत.

देशातील संक्रमित लोकांपैकी केवळ २.४ टक्के लोकांचे वेळेवर निदान.

मृत्युंची संख्या २ लाखांनी वाढली

हेपॅटायटीसमुळे झालेल्या मृत्युंची अंदाजे संख्या २०१९ मध्ये ११ लाखांवरून २०२२ मध्ये १३ लाख झाली. जगभारत हेपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे दररोज ३,५०० लोक मृत्युमुखी पडत आहेत.

हिपॅटायटीस कारणे….

पॅटायटीस बी आणि सी असुरक्षित इंजेक्शन पद्धतींद्वारे आणि दूषित सीरिंज आणि सुया, संक्रमित रक्त्त आणि रक्त उत्पादने, लैंगिक संक्रमण, संक्रमित आईपासून बाळापर्यंत प्रसार होतो.

निदान होत नाही हेच मोठे कारण

हेपॅटायटीस संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर प्रगती होऊनही मृत्यूदर मात्र वाढत आहे. कारण हेपॅटायटीस असलेल्या फारच कमी लोकांचे निदान आणि उपचार वेळेवर केले जातात, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अँधानोम ब्रेयसस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत