मानवी साखळीद्वारे केलेला अकोला जिल्ह्याचा नकाशा.

Lok Sabha Elections: अकोलेकरांनी मानवी साखळी करून केला मतदानाचा जागर

Blog अकोला लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Elections: अकोला लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २६ एप्रिल रोजी होत आहे. त्या अनुषंगाने मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती व्हावी, तसेच मतदानाचे उद्दिष्ट  ७५ टक्क्यांवर पोहोचावे या अनुषंगाने रविवारी लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात विसेष उपक्रम राबविण्यात आला.

मानवी साखळीद्वारे केलेला अकोला जिल्ह्याचा नकाशा.
मानवी साखळीद्वारे केलेला अकोला जिल्ह्याचा नकाशा.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २६ एप्रिल रोजी होत आहे. त्या अनुषंगाने मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती व्हावी, तसेच मतदानाचे उद्दिष्ट  ७५ टक्क्यांवर पोहोचावे या अनुषंगाने रविवारी लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात विसेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अकोलेकरांनी मानवी साखळी तयार करून मतदानाची शपथ घेतली. या प्रसंगी मानवी साखळीद्वारे केलेला अकोला जिल्ह्याचा नकाशा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

मतदान जागृती विषयक उपक्रमाला जिल्हाधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी,आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘स्वीप’अंतर्गत नागरी भागाबरोबरच गावपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत. मतदानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी केले.

विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळो उपस्थितांनी केला. मानवी साखळीबरोबरच ‘मैं भारत हूँ’या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले. समन्वय अधिकारी गजानन महल्ले, आर. जे. पल्लवी , आर. जे. दिव्या यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत