Budget 2024 Update

Budget 2024 Update : अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ग्रामीण भागात आणखी दोन कोटी आवास

Blog भारत

Budget 2024 Update : केंद्र शासनाने सर्वांना पक्की घरे देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड ते अडीच लाखांचा निधी दिला जात होता. आता निधीत वाढ न करता या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आजच्या अंतरिम बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.

Budget 2024 Update
Budget 2024 Update

प्रधानमंत्री आवास (Rural) योजनेतून मिळणार घरे

यानुसार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( Pradhan Mantri Awas Yojana-Gramin) मधून दोन कोटी घरे बांधली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने गरीब, महिला आणि शेतकरी आमच्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुमारे 70 टक्के महिलांना या योजनेचा लाभ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

5 वर्षांत 2 कोटी घरांचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार जवळ असल्याचे सांगत, पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचे सरकार मध्यमवर्गातील पात्र घटकांना त्यांची स्वतःची घरे खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू करणार असल्याचे सीतारामण यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत