The wife killed her husband अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्यांतगर्त येत असलेल्या तामशी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराची हत्त्या झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ही हत्त्या मृतकाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केल्याची माहिती समोर आली आहे.
बाळापूर/वाडेगावः अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्यांतगर्त येत असलेल्या तामशी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराची हत्त्या झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ही हत्त्या मृतकाच्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून केल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद शालीग्राम मेसरे (३२, रा. तुलंगा) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृताची पत्नी व व प्रियकर या दोघांना मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगा खुर्द येथील प्रमोद जानकीराम मेरे हे तामसी येथे वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी झोपेत असताना त्यांच्या हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती परिसरात परसरली होती. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मंगळवारी प्राप्त झालेल्या शवविच्छेद अहवालात प्रमोदचा मृत्यू हा गुदमरल्याने झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. संशयावरून मृताची पत्नी मंगला मेसरे (२७) हिची कसून चोकशी केली असता तिने गोटी मेसरे (२९) च्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच गोटू मेसरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन करण्यात आली आहे.
चुलताच निघाला आरोपी
आरोपी गोटू मेसरे हा मृत प्रमोद मेसरेचा चुलत भाऊ असल्याची माहिती देम्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंजक कांबळे करीत आहेत.