'आयपीएलमध्ये' वापरली जाणार हाॅक आय प्रणाली;१५ पंचांची निवड

IPL hawkeye:’आयपीएलमध्ये’ वापरली जाणार ‘हाॅक-आय’ प्रणाली;१५ पंचांची निवड

Blog क्रीडा

IPL hawkeye: आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत ‘हाॅक-आय’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पंचांच्या निर्णयावर घेतलेल्या डीआरएसचे निर्णय अधिक अचूक राहण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. यासाठी १५ पंचांनी निवड करण्यात आली आहे.

'आयपीएलमध्ये' वापरली जाणार हाॅक आय प्रणाली;१५ पंचांची निवड
‘आयपीएलमध्ये’ वापरली जाणार हाॅक आय प्रणाली;१५ पंचांची निवड

मुंबई ः आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत ‘हाॅक-आय’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पंचांच्या निर्णयावर घेतलेल्या डीआरएसचे निर्णय अधिक अचूक राहण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. यासाठी १५ पंचांनी निवड करण्यात आली आहे. यामुळे आधीच तंत्रपूर्ण असलेली आयपीएल स्पर्धा आता अधिक हाय टेक होणार आहे. नव्या प्रणालीचा वापर केल्यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय कमी वेळात देता येणार आहेत. यासाठी ‘हाॅक-आय’ प्रणालीचे तंत्रज्ञान तिसऱ्या पंचासोबत बसणार आहेत.

बीसीसीआयने ही प्रणाली समजून घेण्यासाठी काही निवडक पंचांची दोन दिवसीय कार्यशाळा घेतली होती. यातून आगामी आवृत्तीच्या नव्या प्रणालीवर काम करण्यासाठी १५ पंचांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत तिसऱ्या पंचाला यष्टिचीत, पायचीत, धावबाद, अशाबाबत निर्णय घेताना एका वेळी एकच क्षण बघता येत होता. या नव्या प्रणालीमुळे तिसऱ्या पंचाला एका वेळी चारही बाजूने तो क्षण दिसणार असल्यामुळे तो झटकन निर्णय घेऊ शकेल.

किती ‘हाॅक-आय’ कॅमेऱ्यांचा वापर होणार ?

या प्रणालीचा वापर करण्यासाठी मैदानावर आठ ‘हाॅक-आय’ कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. हे आठही कॅमेरे मैदानालगत बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन कॅमेरे खेळपट्टीच्या चारही बाजूने बसवले जातील. यामुळे जमिनीलगत घेतल्या जाणाऱ्या झेलांचा निर्णय अधिक अचूक पद्धतीने घेता येऊ शकेल. यामध्ये एक कॅमेरा थेट क्षण दाखवेल, तर दुसरे कॅमेरे त्यांच्या बाजूने क्षण दाखवतील.

आयपीएलचे थेट प्रसारण करणारे तज्ज्ञ आउट!

मैदानावरील पंचांच्या निर्णयाला दाद मागितली गेल्यावर आतापर्यंत तिसरे पंच थेट प्रसारण करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करत होते. तेव्हा पंच आणि ‘हाॅक-आय’ प्रणाली यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत होते. मात्र, आता प्रसारण करणाऱ्या तज्ज्ञांना सहभागी करुन घेतले जाणार नाही. निर्णय अधिक गतिशील आणि अचूक राहावेत यासाठी हाँक आय तज्ज्ञच तिसऱ्या पंचासोबत बसणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत