Howrah-Mumbai Central Holi Special Express does not stop at Akola मध्य रेल्वेच्या अप डाऊन मार्गावर ही गाडी चालविण्यात येणार असून बहुतांश मोठ्या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. मात्र, मध्य रेल्वेला मोठा महसुल मिळवून देणाऱ्या अकोला जंक्शनवर या होळी विशेष रेल्वे गाडीला थांबा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अकोला ः उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन् सणासुदीच्या दिवस यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हावडा व मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या अप डाऊन मार्गावर ही गाडी चालविण्यात येणार असून बहुतांश मोठ्या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. मात्र, मध्य रेल्वेला मोठा महसुल मिळवून देणाऱ्या अकोला जंक्शनवर या होळी विशेष रेल्वे गाडीला थांबा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ०७७४३ हावडा-मुंबई सेंट्रल होळी विशेष एक्स्प्रेस २५ मार्च रोजी पहाटे ३ वाजता हावडा येथून रवाना होणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच ०८८४४ मुंबई सेंट्रल हावडा होळी विशेष एक्स्प्रेस २८ मार्च रोजी १०.३५ वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून रवाना होणार असून दुसऱ्या दिवशी २०.०५ वाजता हावडा स्थानकावर पोहोचणार आहे.
बडनेरानंतर थेट भुसावळला थांबा
अप व डाऊन अशा दोन्ही मार्गावरील गाड्यांना खडगपुर, टाटानगर, चक्रधरपूर, राऊलकेला, झारसुगुडा, बिलासपूसर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, बडनेरा, भुसावल, अमळनेर, नंदुरबार, भेटस्थान, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबा असणार आहे. मात्र, अकोल्यात ही गाडी थांबणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.