Lok Sabha Election 2024: गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फाॅर्म्युला निश्चित केला आहे. मंगळवारी मविआ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोणता पक्ष किती जागा लढणार, तसेच निवडणुकीला महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यांसह सामोरे जाणार याबाबतची माहिती देत असताना २१-१७-१० असा फार्म्युला राहणार असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेली जागावाटपाची चर्चेवर अखेर पूर्णविराम मिळाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी मविआ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोणता पक्ष किती जागा लढणार, तसेच निवडणुकीला महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यांसह सामोरे जाणार याबाबतची माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघाम वाजले असताना लवकरच पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरीदेखील महा विकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद सुरु होता. या वादाला पूर्णविराम लागायचं म्हटलं जातंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युल्याची घोषणा केली.
महाविकास आघाडीचा 21 : 10 : 17 चा फॉर्म्युला अंतिम
शिवसेना ठाकरे गट – 21
काँग्रेस – 17
राष्ट्रवादी शरद पवार गट – 10
काँग्रेस 17 जागांवर लढणार
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, नाणेर, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादीची यादी
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड
21 जागा उद्धव ठाकरे गट
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य