Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार

Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार

Blog भारत

Gnanvapi case : मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणात जिल्हा न्यायालयाने बुधवार 31 जानेवारी रोजी मोठा निर्णय दिला. यानुसार, आता हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेसाठी व्यवस्था करावी लागणार आहे.

Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार
Gnanvapi case : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय, हिंदूंना मिळाला नियमीत पूजनाचा अधिकार

Gnanvapi case : वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. अखेर बुधवारी ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकारी हिंदू पक्षाला मिळाला आहे. याशिवाय कोर्टाने जिल्हा प्रशासनाला सात दिवसांमध्ये पूजेसंदर्भात व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. व्यास तळघर हे ज्ञानवापी मशीदीच्या आतमध्ये आहे. सध्या व्यास तळघर (Vyas ka Tehkhana)सील करण्यात आले आहे. यापूर्वी येथे हिंदूंकडून पूजा केली जायची.

 पूजा पद्धतीचा निर्णय (decision) काशी विश्वनाथ ट्रस्ट घेईल – विष्णु शंकर जैन

हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी कोर्टाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. विष्णु शंकर यांनी म्हटले की, हिंदूंना व्यास तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला सात दिवासांमध्ये व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सर्वांना पूजा करण्याचा अधिकार असणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून व्यास तळघरात जशी पूजेची तयारी केली जाईल तेव्हापासून पूजा सुरू होणार आहे. पूजा कशा पद्धतीने करावी यासंदर्भातील निर्णय काशी विश्वनाथ ट्रस्टकडून घेतला जाईल असेही विष्णु शंकर जैन यांनी म्हटले आहे.

न्यायाधीश के.एम. पांडे यांनी राम मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी 1 फेब्रुवारी 1986 रोजी आदेश दिला होता. कोर्टाने ज्ञानवापीसंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचेही विष्णु शंकर जैन यांनी म्हटले आहे.

विष्णु शंकर जैन यांनी पुढे बोलताना म्हटले की, एका सरकारने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत हिंदूंच्या पूजा-प्रार्थनेवर बंदी घातली होती. आज कोर्टाने ती आपल्या लेखणीने सुधारली आहे.

न्यायालयाने (court) आदेशात काय म्हटले?

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आला आहे. त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगही हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला आहे.

1993 मध्ये बंद करण्यात आली होती तुळघरातील पूजा

ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवतेच्या मूर्तीची पूजा करत असत. डिसेंबर 1993 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुलायम सिंह सरकारच्या तोंडी आदेशानुसार, तळघर सील करण्यात आले आणि तळघरात पूजा करण्यास मनाई करण्यात आली. नंतर तिथे बॅरिकेड लावण्यात आले. तळघर 1993 पासून बंद होते. तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे संरकक म्हणून ठेवण्यात आली होती. 2016 मध्ये सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करुन त्यांची मालमत्ता परत करण्याची मागणी केली होती.

 

आणखी वाचा : 

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प!

Rajya Sabha Elections:महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार ५६ जागांसाठी मतदान

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत