केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली राज्यसभा निवडणुकीची तारीख
Rajya Sabha elections announced in 15 states including Maharashtra:देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे.
Election Commission announces poll schedule for 56 #RajyaSabha seats in 15 states. pic.twitter.com/kGtIyREbxc
— All India Radio News (@airnewsalerts) January 29, 2024
या राज्यांमध्ये होणार Rajya Sabha elections
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
अशी आहे राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून, ते कधीही विसर्जित होत नाही. मात्र, या सभागृहाचे एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यांचा कालवधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे निश्चित केली आहे.
राज्यसभेला काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं. यालाच वरिष्ठ हाऊस म्हणजे अप्पर हाऊसही संबोधलं जातं. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० जागा असू शकतात तर, त्यापैकी १२ सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. उर्वरित २३६ सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि २ सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात.
1 thought on “Rajya Sabha elections:महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार ५६ जागांसाठी मतदान”