prediction of Baba Venga: भविष्यात घडणाऱ्या भाकितांचा विषय निघाला, की बाबा वेंगा हे नाव नजरे समोर येतं. त्यांनी केलेली अनेक भाकीतं गत काही वर्षात खरी ठरल्याचा दावा केला जातो. अशातच त्यांनी २०२४ या वर्षासाठी केलेले धक्कादायक भाकीतं देखील खरे ठरत असल्याचे सांगितल्या जात आहे.
बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अंदाज आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत खरे ठरले आहेत. आता त्यांनी 2024 या वर्षासाठी केलेले धक्कादायक दावेही समोर आले आहेत.मग यामध्ये चेर्नोबिल आपत्ती, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांचे भाकीत करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मृत्यूला आता 3 दशक होत आहे तरी देखील त्यांचे भाकीत खरे ठरत आहे. त्यांनी 2024 मधील काही अंदाज व्यक्त केले होते, ते आता खरे ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यावर्षीच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात यूके येथील एका वृत्तसंस्थेने बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची मालिका प्रसिद्ध केली होती.यामध्ये परकीय आक्रमणे, पुनीत यांचा अंत आणि युरोपातील दहशतवाद यासह इतर भाकीत देखील करण्यात आले होते. या वर्षीच्या भाकिता पैकीच काही भाकीत तीन महिन्याचं खरे ठरल्याचा दावा केला जात आहे.
जाणून घ्या काय आहेत ते भाकीत?
१ हवामान बद
हवामानातील गंभीर घटना आणि नैसर्गिक आपत्तींचा देखील अंदाज लावला होता.तेच भाकीत आता खरे आहे. संपूर्ण जगात उपासमार,पाण्याची समस्या तसेच इतर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना दिसत आहे.
२ सायबर हल्ले
बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला तेव्हा ईंटरनेट नुकतंच आलं होत. त्यामुळे त्यावेळीच त्यांनी सायबर आणि त्यातील वाढती गुन्हेगारी यावर भाष्य केलं होत. अलीकडच्या काळात सायबर हल्ल्यावर नजर टाकली तर, त्याची वाढती व्याप्ती आणि त्यातील वेगवेगळे प्रकार लक्षात येतात.त्यामुळे त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे.
३. आर्थिक संकट
1996 साली निधन झालेल्या बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीत केले होते. ज्यामध्ये बेरोजगारी, आणि नोकरी कपात अश्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितलं होत. यूएसए आणि अनेक राष्ट्र, सध्या सतत चलनवाढीशी झुंजत आहेत.
4. पुतिनचा शेवट
बाबा वंगा यांनी भाकीत केले होते की पुतिन यांचा एक देशवासी 2024 मध्ये त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करेल. मार्च 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आलेले पुतीन यांना यापूर्वी पाच हत्येच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागले आहे.