Lok sabha elections 2024 Akola,Amravati, Buldhana dates: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार, पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांमध्ये तर २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या सहा जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नवी दिल्ली : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, एप्रिल महिन्यात देशभरात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सुमारे ९७ कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवणार आहेत. ते म्हणाले की, १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजीव कुमार पुढे म्हणाले की, “आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, जे काही खंडांच्या एकत्रित मतदारांपेक्षा जास्त आहेत. १०.५ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी मतदान अधिकारी, सुरक्षा अधिकारी. ५५ लाखांहून अधिक ईव्हीएम, ४ लाख वाहने असतील.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात (Lok Sabha) मतदान होणार मतदान
पहिला टप्पा : मतदान – १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा : मतदान – २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा : मतदान – ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा : मतदान १३ मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा : मतदान २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई
या राज्यांत महिला मतदारांची संख्या अधिक
देशभरातील मतदारांमध्ये लिंग गुणोत्तर ९४८ आहे आणि १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी सज्ज
८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी तसेच देशभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केल्याचीही माहिती आहे.