Lok Sabha Election 2024: अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या ७० कुटुंबातील सुमारे ३०० पेक्षा जास्त मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.
अकोला : अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या ७० कुटुंबातील सुमारे ३०० पेक्षा जास्त मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.
दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळपासून उत्साहात सुरूवात झाली,मात्र अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील ७० कामगार कुटुंबीयांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.प्रशासनाने या ७० कामगार कुटुंबियांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर या कामगार कुटुंबियांनी दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. अखेर, या कामगार कुटुंबियांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकत आपला रोष व्यक्त केला. या ७० कुटुंबांमध्ये सुमारे ३०० पेक्षा जास्त मतदार असून त्या सर्वांचा मतदानावर बहिष्कार घातल्याचे कृष्णा तायडे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
अकोल्यातील बिर्ला कॉलनी परिसरातील क्वाॅर्टरमध्ये ७० कामगारांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत.
या कुटुंबियांच्या क्वाॅर्टरसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सुरू.
सुनावणी सुरू असतानाच प्रशासनातर्फे या ७० कुटुंबांना घरे खाली बजावली नोटीस बजावण्यात आली.
घरे खाली केल्यास कामगारांचे कुटुंबिय अडचणीत येणार म्हणून त्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते.