Fraud of woman through mobile link: क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करून देताे, असे सांगत एका महिलेच्या मोबाइलवर लिंक पाठवून अज्ञाताने महिलेची २ लाख ६४ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला: क्रेडिट कार्ड अँक्टीव्ह करुन देण्याच्या नावाखाली एका महिलेच्या मोबाइलवर लिंक पाठवून एका भामट्याने २ लाख ६४ हजार रुपयाने गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोरक्षण रोड स्थित किर्तीनगरातील एका महिलेला अज्ञात आरोपीने तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले असून ते पुन्हा सुरू करुन देतो, असे सांगत महिलेच्या मोबाइलफोनवर एक लिंक पाठविली. तसेच महिलेला एक अर्ज भरायला सांगितला. त्यानुसार, महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यातून २ लाक ६४ हजार ४३९ रुपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय शेळके (५९) रा. किर्तीनगर, गोरक्षण रोड यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास खदान पोलिस करीत आहेत.