हृतिक रोशनच्या Fighter सिनेमावर फटका; आखाती देशात बंदी
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन याचा ‘Fighter’सिनेमा नुकताच जगभरात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर अशातच आखाती देशांनी ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट केवळ UAE मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
Fighter Movie Banned in Gulf Countries : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमा ‘फायटर’ (Fighter) २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अशातच सिनेमासंदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘फायटर’ सिनेमावर आखाती देशांनी (Gulf Countries) बंदी घातली आहे. यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.
आखाती देशांमध्ये फायटर सिनेमावर बंदी
चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माते गिरीश जोहर (Girish Johar) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती देत म्हटले की, पाच आखाती देशांनी हृतिक रोशनच्या ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातली आहे. सिनेमा फक्त संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला युएईमधील सेंसर बोर्डाने PG15 रेटिंग दिली आहे. ‘फायटर’ सिनेमावर आखाती देशांनी बंदी का घातलीय याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
In a setback, #Fighter officially banned across Middle East regions for theatrical release. Only UAE will release the film with PG15 classification !@iHrithik @AnilKapoor @deepikapadukone @justSidAnand #BOTracking pic.twitter.com/vPjIV2Acz1
— Girish Johar (@girishjohar) January 23, 2024
‘फायटर’ सिनेमाची कथा
‘फायटर’ सिनेमाची कथा बालाकोट एअरस्ट्राइकवर (2019 Balakot Airstrike) आधारित आहे. या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोणसह अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय झळकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे बजेट २५० कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.