Depression

Depression and phobias are increasing तरुणाईमध्ये वाढतेय नैराश्य अन् फोबियाचे प्रमाण

Blog आरोग्य

Depression and phobias are increasing बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्येही ताणतणाव वाढला आहे. परिणामी तिशीतील युवकही नैराश्य, चिंता अन् फोबियाचे शिकार होत आहेत. नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेलेल्या अशा तरुणांना उच्च रक्तदाबासोबतच मधुमेह अन् हृदयविकारासारख्या आजारांनाही समोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नैराश्य, चिंता सोडा; मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक जगा!

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्येही ताणतणाव वाढला आहे. परिणामी तिशीतील युवकही नैराश्य, चिंता अन् फोबियाचे शिकार होत आहेत. नैराश्येच्या गर्तेत खेचल्या गेलेल्या अशा तरुणांना उच्च रक्तदाबासोबतच मधुमेह अन् हृदयविकारासारख्या आजारांनाही समोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातून बाहेर निघत तरुणांनी मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक जीवन जगण्याची गरज असून, त्यासाठी कौटुंबिक संवाद वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.

Depression
Depression

मध्यंतरी कोरोनामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प होते. परिणामी अनेकजण बेरोजगार झाले. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे पर्यायी साधनंही नसल्याने चिंता वाढली होती. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले आहे, मात्र अजूनही अनेकांच्या जीवनात नैराश्य, चिंता आदी घर करून बसले आहे. त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर पडताना दिसत आहे. यामध्ये तिशीतील तरुणांची संख्या अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैराश्य, फोबिया, चिंता यासारख्या मानसिक आजाराची लक्षणं तरुणांमध्ये आढळून येत आहेत. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य राखण्यासाठी नागरिकांनी कौटुंबिक संवाद वाढवून सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा, असे अवाहन मनोविकारतज्ज्ञांनी दिले आहे.

 

नैराश्य (Depression), चिंतामुक्तीसाठी हे करा  

योगा, व्यायाम करा.

कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधा.

लहानमुलांसोबत वेळ घालवा.

नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांकडे लक्ष केंद्रित करा.

नावरन्यपूर्ण उपक्रम राबवा.

पुस्तक वाचा.

 

तणावमुक्तीसाठी (Stress relief) डॉक्टर्स काय करतात?

दररोज सकाळी सायकलिंग

मॉर्निंग वॉक

कुटुंबातील सदस्यांसोबत इनडोअर गेम्स

पुस्तक वाचन

काय म्हणतात डॉक्टर?

मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य अन् त्यातून होणारी चिडचिड, याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातून पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने कौटुंबिक संवाद वाढविणे आवश्यक असून, सकारात्मक विचारसरणीतून पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.

– डॉ. अनुप राठी, मानसोपचारतज्ज्ञ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत