Arrest warrant issued against Lalu Yadav: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ग्वाल्हेर येथील पीएमएलए न्यायालयाने 1995 आणि 1997 च्या आर्म्स ऍक्ट प्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.
ग्वाल्हेर : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ग्वाल्हेर येथील पीएमएलए न्यायालयाने 1995 आणि 1997 च्या आर्म्स ऍक्ट प्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या नावाने शस्त्रे खरेदी करण्यात आली होती आणि ती शस्त्रे वेगवेगळ्या ठिकाणी पुरवण्यात आली होती. तपासानुसार, हे कथित प्रकरण, ऑगस्ट 1995 ते मे 1997 दरम्यान घडले. या कालावधीत, तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून काडतुसे खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी 23 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. लालू यादव यांना हजर राहण्याची न्यायालयाची नोटीस असूनही, ते हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला आणि जुलै 1998 मध्ये आरोपपत्र दाखल केले. तेव्हापासून, ग्वाल्हेर पीएमएलए न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे.