Anup Dhotre’s candidature application was filed: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ एप्रिल अखेरची मुदत आहे. भाजपतर्फे ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, सकाळी ९ वाजतापासून डाॅ. बाबासाहेब खुले नाट्यगृहासमोरील भाजप कार्यालयासमोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत आले होते.
अकोलाः महायुतीचे शक्तीप्रदर्शन करीत भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बुधवार ३ एप्रिल रोजी अकोला लोकसभा चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आकाश फुंडकर, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, माजी मंत्री रणजीत पाटील, शिंदे सेनेचे माची आमदार गोपिकिशन बाजोरिया उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत महायुतीतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उखेरची मुदत आहे. भाजपतर्फे एक दिवस आधीच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळी ९ वाजतापासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील भाजपा कार्यालयासमोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्रीत जमले होते. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेला सुरुवात झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला.
अकोल्याला विकासाची दृष्टी असलेला उमेदवार – फडणवीस
अकोला लोकसभा मतदार संघात यावर्षी तरुण उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवले असून ते विकासाची दृष्टी असलेले उमेदवार आहे. देशाला पुढच्या पाच वर्षात आर्थिक महासत्ता करुन देश व महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.