2 accused in Rameswaram cafe blast arrested: बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे आहेत.
बंगळुरू : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, 2 मार्च रोजी शाजिबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता, तर ताहाने संपूर्ण योजना तयार केली होती.
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने 5 एप्रिल रोजी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आणि सहआरोपींची ओळख पटली आहे. मुसाविर हुसेन शाजिब हा मुख्य आरोपी असून अब्दुल मतीन ताहा हा सहआरोपी आहे. मुसावीरनेच कॅफेमध्ये स्फोटके नेली होती. दोघेही शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथील रहिवासी आहेत.
या दोघांच्या शोधात एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपीमधील 18 ठिकाणी छापे टाकले होते. या दोघांवर 29 मार्चपासून 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचवेळी तपास यंत्रणेने बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप कार्यकर्ता साईप्रसादलाही ताब्यात घेतले आहे. कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपींशी साईचे संबंध असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.